दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०८

जनरल नॉलेज


Q.1) 22 आणि 23 डिसेंबर 2017 रोजी कुठे ‘सुशासन व सर्वोत्तम सरावपद्धतींची प्रतिकृती विषयक प्रादेशिक परिषद’ आयोजित करण्यात आली होती?
A) अहमदाबाद
B) मुंबई
C) पटना
D) गुवाहाटी
उत्तर : D) गुवाहाटी
स्पष्टीकरण : 22 आणि 23 डिसेंबर 2017 रोजी आसामच्या गुवाहाटी शहरात ‘सुशासन व सर्वोत्तम सरावपद्धतींची प्रतिकृती विषयक प्रादेशिक परिषद’ पार पडली. भारत सरकारच्या कार्मिक, जन तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा व जन तक्रार विभाग (DARPG) द्वारा आसाम राज्य शासनाच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन केले गेले.


Q.2) अमेरिकेत ________ खर्च असणार्या एका कर फेरबदल विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे. राष्ट्राच्या कर कायद्यांत 1986 सालापासूनचे हे सर्वात मोठे फेरबदल आहे.
A) $1.5 लाख कोटी
B) $2.5 लाख कोटी
C) $3.5 लाख कोटी
D) $4.5 लाख कोटी
उत्तर : A) $1.5 लाख कोटी
स्पष्टीकरण : अमेरिकेत $1.5 लाख कोटी खर्च असणार्या एका कर फेरबदल विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे. करात अधिक कपात करणारा हा नवीन कायदा महामंडळे आणि श्रीमंत अमेरिकावासीयांची मोठ्या प्रमाणात कर कपात करणार तसेच इतर कुटुंबियांसह अधिक मर्यादित कपात राहतील. 1986 सालापासून राष्ट्राच्या कर कायद्यांत ही सर्वात मोठे फेरबदल आहे, ज्यामुळे पुढील दशकात राष्ट्राच्या कर्जात $1.5 लाख कोटी रकमेची भर घालू शकते.


Q.3) भारतातली पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन कुठे सुरू करण्याची योजना आहे?
A) कोलकाता
B) मुंबई
C) नवी दिल्ली
D) चेन्नई
उत्तर : B) मुंबई
स्पष्टीकरण : देशात वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करण्याच्या उद्देशाने, भारतीय रेल्वे भारतातली पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन मुंबईमध्ये सुरू करण्याची योजना करीत आहे. मुंबई उपनगराच्या पश्चिम रेलमार्गावर पश्चिम रेल्वे चर्चगेट आणि बोरीवली आणि विरार स्थानक यादरम्यान 12 डब्ब्यांची ही ट्रेन धावणार आहे.


Q.4) कोणते राज्य शासन शीख समुदायांसाठी समर्पित ‘गुरु सर्किट’ तयार करण्याची योजना आखत आहे?
A) उत्तरप्रदेश
B) पंजाब
C) बिहार
D) महाराष्ट्र
उत्तर : C) बिहार
स्पष्टीकरण : बिहार राज्य शासन देश-विदेशातील शीख समुदायांसाठी समर्पित अश्या धार्मिक गंतव्य पर्यटनासाठी ‘गुरु सर्किट’ तयार करण्याची योजना तयार करीत आहे. गुरु सर्किटमध्ये पटना साहिबचे तख्त हरमंदिर साहिब, जुन्या पटनातील सर्व ठिकाण, दानापूरचे हांडी साहिब, गईघाटमधील गुरु तेग बहादुर गुरुद्वारा, राजगीरमधील गुरू नानक कुंड, मुंगेरमधील गुरू पाचीस संगत आणि आरा, कटिहार, नवादा, गया, सासाराम आणि भागलपूर येथील गुरुद्वारा या ठिकाणांना जोडण्यात येईल.


Q.5) कोणत्या भारतीय मुष्टियोद्धाने ‘WBO ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले?
A) गौरव भिदुरी
B) शिवा थापा
C) अखिल कुमार
D) विजेंदर सिंह
उत्तर : D) विजेंदर सिंह
स्पष्टीकरण : भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंहने ‘WBO ओरिएंटल अँड एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. जयपुरमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत विजेंदरने आफ्रिकेमधील घानाच्या अर्नेस्ट एमुजु याचा पराभव केला. या सोबतच विजेंदरने प्रो-बॉक्सिंगमध्ये सलग दहाव्यांदा आपला विजय नोंदवला.


Q.6) IOC ______ देशाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे. IOC ने आतापर्यंत एकूण ____ देशाच्या 43 खेळाडूंवर बंदी घातली आहे.
A) अमेरिका
B) फ्रान्स
C) रशिया
D) कजाकिस्तान
उत्तर : C) रशिया
स्पष्टीकरण :आंतरराष्ट्रीय ऑलंपिक समितीने (IOC) रशियाच्या 11 खेळाडूंवर आजीवन बंदी घातली आहे. IOC ने आतापर्यंत एकूण रशियाच्या 43 खेळाडूंवर बंदी घातली आहे. 2014 हिवाळी ऑलंपिक खेळांमध्ये डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली IOC ने हा निर्णय घेतला.


Q.7) BCCI चे नवे महाव्यवस्थापक कोण आहेत?
A) एम. व्ही. श्रीधर
B) साबा करीम
C) राहुल जोहरी
D) यापैकी नाही
उत्तर : B) साबा करीम
स्पष्टीकरण : भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) च्या महाव्यवस्थापकपदी साबा करीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करीम 1 जानेवारी 2018 रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ते एम. व्ही. श्रीधर (ऑक्टोबरमध्ये निधन) यांच्या राजीनाम्यानंतर या पदाचा स्वीकार करणार. ते CEO राहुल जोहरी यांना आपला अहवाल देतील.


Q.8) डिसेंबर 2017 मध्ये दक्षिण फिलिपीन्समध्ये ताशी 125 किलोमीटरच्या वेगाने धडकलेल्या उष्णकटिबंधीय वादळाचे नाव ओळखा.
A) ओता
B) कोमुरा
C) टेम्पब्लिन
D) व्हेलेसीन
उत्तर : C) टेम्पब्लिन
स्पष्टीकरण : दक्षिण फिलिपीन्समध्ये ताशी 125 किलोमीटरच्या वेगाने ‘टेम्पब्लिन’ या उष्णकटिबंधीय वादळाची धडक बसलेली आहे. वादळामुळे प्रचंड पावसाचे थैमान सोबतच भूस्खलनामुळे जवळपास 182 जन मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि 50,000 हून अधिक लोकांना दुसर्या ठिकाणी हटविण्यात आले आहे.


Q. 9) फोर्ब्स इंडियाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय ख्यातनाम व्यक्तींच्या यादीत प्रथम तीन स्थानी नसलेल्या व्यक्तीचे नाव ओळखा.
A) अमिताभ बच्चन
B) सलमान खान
C) शाहरुख खान
D) विराट कोहली
उत्तर : A) अमिताभ बच्चन
स्पष्टीकरण : फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय ख्यातनाम व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेता सलमान खान याने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. 51 वर्षीय सलमान खान वार्षिक 232.83 कोटी रुपयांसह ख्यातनाम श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. यादीतील शीर्ष तीन स्थानी यावेळीही सलमान खान, शाहरुख खान (दुसरा) आणि विराट कोहली (तिसरा) यांनी आपले स्थान कायम राखले आहे.


Q.10) डिसेंबर 2017 मध्ये भारताच्या विमा नियामक IRDAI ने _________ याबाबत दिशानिर्देश जाहीर केले आहेत, ज्यामुळे विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसाठी IFSC-विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यामध्ये सुविधांची उभारणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
A) आंतरराष्ट्रीय विमा सेवा केंद्र (IISC)
B) भारतीय परराष्ट्र विमा संघटना (FIOI)
C) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO)
D) परराष्ट्र विमा कार्यालय (FIO)
उत्तर : C) आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO)
स्पष्टीकरण : भारताच्या विमा नियामक IRDAI ने ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालये (IIO) याबाबत दिशानिर्देश जाहीर केले आहेत, ज्यामुळे विमा आणि पुनर्विमा कंपन्यांसाठी IFSC-विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यामध्ये सुविधांची उभारणी करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. 21 डिसेंबरला जाहीर केलेल्या ‘भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरण (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालयाची नोंदणी आणि कार्ये) मार्गदर्शक तत्त्वे-2017’ अन्वये, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र विमा कार्यालय (IIO) म्हणजे थेट विमा व्यवसाय किंवा पुनर्विमा व्यवसाय चालविण्यासाठी IRDAI कडून परवानगी असलेले एक शाखा कार्यालय होय.



कारणं सांगणारे लोक,
यशस्वी होत नाहीत...
आणि यशस्वी होणारे लोक 
कारणं सांगत नाहीत...!
Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send