दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०६

जनरल नॉलेज


Q.1) डिसेंबर 2017 मध्ये केंद्र शासनाने तात्काळ प्रभावाने कोणत्या खाद्य वस्तूवर 30% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला?
A) चणा
B) मसूर
C) पाम तेल
D) A आणि B
उत्तर : D) A आणि B
स्पष्टीकरण : केंद्र शासनाने तात्काळ प्रभावाने चणा आणि मसूर यावर 30% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी रबी हंगामात चणा आणि मसूरचे अधिक उत्पादन होण्याची आशा आहे. त्यामुळे स्वस्त आयाताचा प्रभाव त्याच्या किंमतीवर पडू शकतो. त्यामुळे शेतकर्यांचे हित जपण्याकरिता आयात शुल्कात ही वाढ करण्यात आली आहे.


Q.2) NHAI ने महामार्ग प्रकल्पांसाठी देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याहेतु कोणता कक्ष तयार केला?
A) रस्ते व महामार्ग गुंतवणूक संबंध कक्ष (RHIRC)
B) राष्ट्रीय महामार्ग गुंतवणूक प्रोत्साहन कक्ष (NHIPC)
C) नॅशनल हायवे इंवेस्टमेंट इन इंडिया (NHII)
D) यापैकी नाही
उत्तर : B) राष्ट्रीय महामार्ग गुंतवणूक प्रोत्साहन कक्ष (NHIPC)
स्पष्टीकरण : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने महामार्ग प्रकल्पांसाठी देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याहेतु एक ‘राष्ट्रीय महामार्ग गुंतवणूक प्रोत्साहन कक्ष (National Highways Investment Promotion Cell -NHIPC)’ तयार केले आहे. NHIPC मुख्य रूपाने रस्त्यांशी जुडलेल्या पायाभूत सुविधांमध्ये विदेशी व देशांतर्गत गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर आपले लक्ष्य केंद्रीत करणार.


Q.3) विद्यापीठ गटात ‘राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार 2016-17’ चा प्रथम पुरस्कार कोणत्या विद्यापीठाला देण्यात आला?
A) गुजरात विद्यापीठ
B) ओडिशा विद्यापीठ
C) पुणे विद्यापीठ
D) दिल्ली विद्यापीठ
उत्तर : A) गुजरात विद्यापीठ
स्पष्टीकरण : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते विविध गटात ‘राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार 2016-17’ प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय ‘राष्ट्रीय सेवा - 2016-17 पुरस्कार’, NSS गट व कार्यक्रम अधिकारी आणि NSS स्वयंसेवकांना प्रदान केले गेले. विद्यापीठ गटात प्रथम पुरस्कार –गुजरात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. हिमांशू पांड्या आणि NSS कार्यक्रम समन्वयक डॉ. नटवरलाल वर्मा.


Q.4) किनाऱ्यापासून 105 मीटरपर्यंतच्या गस्तीसाठीच्या 6 नौकांच्या मालिकेतल्या सहाव्या नौकाचे नाव काय आहे?
A) ICGS प्रताप
B) ICGS सुजय
C) ICGS ध्रुव
D) ICGS प्रयोज
उत्तर : B) ICGS सुजय
स्पष्टीकरण : भारतीय तटरक्षक दलाची गस्ती नौका ‘ICGS सुजय’ भारतीय सेवेत दाखल करण्यात आली आहे. किनाऱ्यापासून 105 मीटरपर्यंतच्या गस्तीसाठीच्या 6 नौकांच्या मालिकेतली ही सहावी नौका आहे. ही 2350 टन वजनी नौका 23 नॉटिकल मैल किमान गतीने मार्गक्रम करते. अत्याधुनिक साधनांनी सज्ज अशी स्वदेशी बनावटीची आहे. या नौकेद्वारे मुख्यत: पूर्व समुद्री किनारा तसेच ओडिशा व पश्चिम बंगालच्या सागरी राज्यांना सुरक्षा देण्यात येईल. ‘ICGS सुजय’ ओडिशाच्या पारादीपमध्ये कमांडर तटरक्षक क्षेत्र (ईशान्य) च्या संचालन व प्रशासनाखाली आहे.


Q.5) डिसेंबर 2017 मध्ये कोणाची ‘ICC महिला ODI टिम ऑफ द इयर’ यामध्ये निवड करण्यात आली?
A) मिताली राज
B) हरमनप्रीत कौर
C) एकता बिस्त
D) A आणि C
उत्तर : D) A आणि C
स्पष्टीकरण : भारतीय कर्णधार मिताली राज आणि गोलंदाज एकता बिस्त या दोन महिला खेळाडूंची ‘ICC महिला ODI टिम ऑफ द इयर’ यामध्ये निवड करण्यात आली आहे. याशिवाय हरमनप्रीत कौर आणि स्पिनर एकता बिस्त यांना ‘ICC महिला टी-20 इंटरनॅशनल टिम ऑफ द इयर’ यामध्ये जागा मिळाली आहे.


Q.6) डिसेंबर 2017 मध्ये भारतात सौरऊर्जेसाठी छतांच्या वापरास चालना देण्यासंदर्भात मंत्रालयाने कोणत्या उपक्रमाची संकल्पना जाहीर केली?
A) RTSTS
B) URJA
C) SRISTI
D) RTS
उत्तर : C) SRISTI
स्पष्टीकरण : देशात सौरऊर्जेसाठी छतांच्या वापरास चालना देण्यासंदर्भात नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ‘सस्टेनेबल रुफटॉप इंप्लिमेन्टेशन फॉर सोलर ट्रान्सफिगरेशन ऑफ इंडिया (SRISTI)’ या उपक्रमाची संकल्पना जाहीर केली आहे.


Q.7) ग्रामीण टपाल कार्यालयाच्या शाखा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यासाठी डिसेंबर 2017 मध्ये कोणत्या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला?
A) डिजिट-ज्ञान
B) ई-ज्ञान
C) दर्पण
D) ध्वनी
उत्तर : C) दर्पण
स्पष्टीकरण : 21 डिसेंबर 2017 रोजी ‘डिजिटल ॲडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिस फॉर ए न्यू इंडिया (DARPAN/दर्पण)’ या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ‘दर्पण’ प्रकल्प बँकेची सुविधा नसलेल्या ग्रामीण लोकसंख्येच्या वित्तीय समावेशनासाठी सुरू केला गेला आहे. प्रकल्पांतर्गत, ग्रामीण नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी यासाठी टपाल कार्यालयाच्या शाखा अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाने अद्ययावत करण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी 1400 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत टपाल कार्यालयाच्या 43,171 शाखा ‘दर्पण’ उपक्रमांतर्गत समाविष्ट झाल्या आहेत.


Q.8) कोणत्या कायद्याच्या जागी ‘नवीन ग्राहक संरक्षण विधेयक-2017’ मंत्रिमंडळाने मंजूर केला?
A) ग्राहक संरक्षण अधिनियम-1975
B) ग्राहक संरक्षण अधिनियम-1963
C) ग्राहक संरक्षण अधिनियम-1982
D) ग्राहक संरक्षण अधिनियम-1986
उत्तर : D) ग्राहक संरक्षण अधिनियम-1986
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्राहकांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी प्राधिकरण गठित करण्याकरिता ‘नवीन ग्राहक संरक्षण विधेयक-2017’ मंजूर केला आहे. जुन्या ‘ग्राहक संरक्षण अधिनियम-1986’ च्या जागी हे विधेयक आणले गेले आहे.


Q. 9) ‘साहित्य अकादमी पुरस्कार-2017’ सोबत विजेत्यांची कोणती जोडी चुकीची आहे?
A) ममंग दाय - ‘इंग्रजी’ गटातले साहित्य
B) रमेश कुंतल मेघ - ‘हिंदी’ गटातले साहित्य
C) सुजाता देशमुख - मराठी कवितासंग्रह
D) रानेन तोईजंबा – ‘मणिपुरी’ नाटक
उत्तर : C) सुजाता देशमुख - मराठी कवितासंग्रह
स्पष्टीकरण : साहित्यकार ममंग दाय आणि रमेश कुंतल मेघ यांना यावर्षीचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार-2017’ जाहीर झाला आहे. ममंग दाय यांना ‘द ब्लॅक हिल’ या कादंबरीला ‘इंग्रजी’ गटातला तर रमेश मेघ यांना ‘विश्व मिथक सरीत सागर’ या टीकात्मक साहित्याला ‘हिंदी’ गटातला पुरस्कार मिळाला. अन्य काही विजेते - महाराष्ट्राच्या श्रीकांत देशमुख (मराठी कवितासंग्रह - ‘बोलावे ते आम्ही..’), अनुवादक सुजाता देशमुख (मराठीतील सर्वोत्तम अनुवादीत पुस्तकाचा पुरस्कार - ‘गौहर जान म्हणतात मला !’), जगदीश लाछानी (सिंधी निबंधमाला) आणि रानेन तोईजंबा (मणिपुरी, नाटक)


Q.10) संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने जेरुसलेमला _______ देशाची राजधानी मानण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरुद्ध मतदान केले आहे.
A) इस्रायल
B) पॅलेस्टाइन
C) ओमान
D) सुदान
उत्तर : A) इस्रायल
स्पष्टीकरण : संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी मानण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरुद्ध मतदान केले आहे. भारत सहित 128 देशांनी अमेरिकेच्या निर्णयाविरुद्ध आपले मत दर्शविले. तर 9 देशांनी निर्णयाला सहमती दिली आणि 35 देशांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले. जेरुसलेम राजधानीचे ठिकाण करण्यावरून इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात दीर्घकाळापासून विवाद सुरू आहेत.



Do the difficult things while they are easy and do the great things while they are small. A journey of a thousand miles must begin with a single step.
Thought By MPSC GUIDE

Archive

Contact Form

Send