चालू घडामोडी : १९ डिसेंबर २०१७

हिमाचलमध्ये भाजपची सत्ता :
  • 👉 हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे साम्राज्य खालसा करत भाजपने सत्ता मिळवली असली तरी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला आहे. 'वैयक्तिक पराभवापेक्षा पक्षाचा विजय महत्त्वाचा असतो. माझा पराभव होईल असे मला वाटले नव्हते. मी या पराभवाचा आढावा घेईन', असे त्यांनी सांगितले.
  • 👉 हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांसाठी 9 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. हिमाचलमध्येही 18 डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. यात भाजपने 44जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसला फक्त 21 जागांवरच समाधान मानावे लागले.
  • 👉 काँग्रेसचा पराभव झाल्याने भाजपच्या गोटात उत्साह असला तरी दुसरीकडे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा दारुण पराभव झाला. धुमल हे हिमाचलच्या सुजनपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र त्यांचा पराभव झाला आहे.
  • 👉 काँग्रेसचे उमेदवार रजिंदर राणा यांनी धुमल यांचा पराभव केला.'जनतेचा काँग्रेसवरील विश्वास या निकालातून दिसून येतो. या विजयासाठी मी जनतेचा आभारी आहे. सुजनपूरमधील जनतेची सेवा करत राहणार', असे आश्वासन रजिंदर राणा यांनी दिले आहे.
हिंदू जागरण मंचाचा खासगी शाळांना इशारा :
  • 👉 खासगी शाळांनी हिंदू विद्यार्थ्यांकडून नाताळच्या सणाची वर्गणी घेऊ नये. तसेच त्यांच्यावर हा सण साजरा करण्याची सक्ती करू नयेअसा इशारा हिंदू जनजागरण मंचाने दिला आहे. त्यासाठी हिंदू जनजागरण मंचाकडून उत्तर प्रदेशात जिल्हा स्तरावर एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेचे सदस्य त्या परिसरातील खासगी शाळांमध्ये जाऊन यासंबंधीचे निवेदन संस्थाचालकांना देतील.
  • 👉 खासगी शाळा या नाताळच्या सणाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करत असल्याचा आरोप हिंदू जनजागरण मंचाने केला आहे. त्यासाठी आम्ही राज्यातील प्रत्येक शाळेत जाऊन हा प्रकार त्वरीत थांबविण्याची मागणी करणार आहोत. ज्या शाळा हा आदेश जुमानणार नाहीत, त्याठिकाणी आंदोलन करण्याचे आदेशही संघटनेने जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांना दिले आहेत. दरम्यान, सरकारने अशा कोणत्याही आदेशाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले आहेत.
आयसीसी क्रमवारीत रोहित शर्मा पाचव्या स्थानी :
  • 👉 श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात व्दिशतक झळकावणाऱ्या भारताच्या रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे.
  • 👉 आयसीसीची एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या क्रमवारीत दोन स्थानांनी बढती घेत रोहित पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
  • 👉 तसेच या क्रमवारीत रोहितने पहिल्यांदाच 800 गुणांचा टप्पा पार केला आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका 2-1 अशी भारताने जिंकली असून रोहितच्या खात्यात 816 गुण आहेत. यापूर्वी रोहितने फेब्रुवारी 2016 मध्ये 825 गुणांची कमाई केली होती.
  • 👉 या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली 876 गुणांसह अव्वलस्थानावर विराजमान आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलियर्स 872 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • 👉 गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने 28व्या स्थानावरून 23व्या स्थान गाठले आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने 16 स्थानांची कमाई करत कारकीर्दीतील सर्वोत्तम 56वे स्थानपटकावले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक :
  • 👉 जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
  • 👉 भारताचा कुस्तीपटू सुशीलकुमार याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपली चमक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटूसाक्षी मलिक हिनेही आपला सुवर्णपदक पटकावत महिला कुस्तीपटूंचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे.
  • 👉 साक्षीबरोबरच अन्य महिला कुस्तीपटूंनीही धमाकेदार कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. साक्षीने 62 किलो वजनी गटात फ्रीस्टाईलमध्ये न्यूझिलंडच्या तायला तुआहिने फोर्ड हिचा 13-2 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
  • 👉 तसेच याशिवाय, भारतीय महिला कुस्तीपटूंनी स्पर्धेमध्ये नऊ सुवर्णसात रौप्य आणि चार कांस्य पदके पटकावली आहेत.

दिनविशेष :
  • 👉 मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते 'मार्टिन ल्यूथर किंग' यांचा जन्म सन 1899 मध्ये 19 डिसेंबर रोजी झाला.
  • 👉 भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 मध्ये झाला.
  • 👉 सन 1961 मध्ये 19 डिसेंबर रोजी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
  • 19 डिसेंबर 2002 रोजी 'व्ही.एन. खरे' यांनी भारताचे 33 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.


ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांना केंद्र सरकारची मदत

  • ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीपला केंद्र सरकारने ३२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
  • याबरोबरच चक्रीवादळामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १४०० घरे बांधून देण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओखी चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या राज्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पीडित शेतकरी आणि बेपत्ता मासेमारांच्या कुटुंबीयांशी देखील चर्चा केली.

जेष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे निधन

  • बडोद्याच्या आधुनिक शिल्पकलेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ शिल्पकार नागजी पटेल यांचे १६ डिसेंबर रोजी वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले.
  • बडोद्यानजीकच्या जुनी जथराटी या खेडय़ात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी १९५६ साली ते महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला विभागात आले.
  • बडोदे महापालिकेची खूण असलेल्या ‘दोन वटवृक्षां’चे आधुनिकतावादी भारतीय शैलीतील शिल्प नागजीभाईंनी घडवले होते.
  • अगदी अलीकडेच बडोदे रेल्वे स्थानकाजवळ ‘कॉलम ऑफ फेथ’ हे नागजी पटेलकृत स्तंभशिल्प उभारण्यात आले आहे.
  • ‘नजर आर्ट गॅलरी’ हे फतेहगंज भागातील कलादालन उभारले जाण्यामागेही त्यांचीच प्रेरणा होती.
  • १९६१साली विद्यार्थी म्हणून त्यांना राष्ट्रीय कलापुरस्कार मिळाला. युगोस्लाव्हिया, जपान, ब्राझील अशा अनेक देशांत जाऊन, तिथल्या दगडांमध्ये नागजीभाईंनी शिल्पे घडवली.
  • सँडस्टोनला शिल्परूप देताना या दगडातील खडबडीतपणा आणि संस्कारांनी त्याला येणारा लोभस गुळगुळीतपणा या दोहोंचा वापर ते करीत.
  • मध्य प्रदेशच्या ‘कालिदास सम्मान’सह अनेक मानसन्मान नागजी यांना मिळाले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने त्यांना सुप्रतिष्ठ (तहहयात) फेलोशिपही दिली होती.

भारताला कच्चे तेल पुरवण्यात इराक आघाडीवर

  • गेली अनेक वर्षे भारताला कच्चे तेल पुरवण्यात आघाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा इराकने हिरावून घेतली आहे.
  • गेल्या तीन वर्षांमध्ये भारत आणि इराक या दोन्ही देशांमधील संबंध वृद्धींगत झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
  • एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या काळामध्ये इराककडून भारताने २५.८ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयातकेली आहे.
  • भारताला कच्चे तेल पुरवण्यात आजवर आघाडीवर असलेला सौदी अरेबिया या काळामध्ये २१.९ दशलक्ष टन इंधन पुरवू शकला तर इराणने १२.५ दशलक्ष टन कच्चे तेल भारताला पुरविले.
  • इराकने गेल्या काही वर्षांमध्ये कमी दरामध्ये भारताला कच्चे तेल पुरवले आहे, त्याचाच परिणाम म्हणून भारताने मोठ्या प्रमाणात इराककडून इंधन आयात केली आहे.

Archive

Contact Form

Send