दररोज जनरल नॉलेज क्रमांक ०५
जनरल नॉलेज
Q.1) स्थानिक कोळसा आधारावर आधीच निश्चित करण्यात आलेल्या ऊर्जा खरेदी करारांसह वीज उत्पादकांसाठी लिलावाच्या आधारावर अधिसूचित किंमतीवर कोळश्याची शृंखला मंजूर करण्यासाठी कोल इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने '______’ अंतर्गत इंधन पुरवठा करारांवर स्वाक्षरी करण्याकरिता मंजूरी दिली आहे.
A) SHAKTI योजना
B) COAL योजना
C) URJA योजना
D) KOYALA योजना
उत्तर : A) SHAKTI योजना
स्पष्टीकरण : कोल इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने 'स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अलॉकेटींग कोयला ट्रान्सपेरंटली इन इंडिया (SHAKTI/शक्ती)’ अंतर्गत इंधन पुरवठा करारांवर स्वाक्षरी करण्याकरिता मंजूरी दिली आहे. ‘शक्ती’ या नवीन धोरणांतर्गत कोळसा मंत्रालय, कोल इंडिया किंवा सिंगरेनी कोलियरिएस कंपनी लिमिटेड यांच्याकडून प्रस्तुत केलेल्या ऊर्जा क्षेत्रातील विविध विभागांसाठी कोळसा शृंखलेच्या वाटपासाठी दिशादर्शके तयार करण्यात आली आहेत, जेणेकरून स्थानिक कोळसा आधारावर आधीच निश्चित करण्यात आलेल्या ऊर्जा खरेदी करारांसह वीज उत्पादकांसाठी लिलावाच्या आधारावर अधिसूचित किंमतीवर कोळश्याची शृंखला मंजूर करता येईल..
Q.2) केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी झालेल्या आरोग्य आणि औषधी क्षेत्रात कोणत्या देशासोबत सहकार्यासंबंधी करारास पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली?
A) युरोपीय संघ
B) ब्रिटन
C) इटली
D) फ्रान्स
उत्तर : C) इटली
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने आरोग्य आणि औषधी क्षेत्रात इटलीसोबत सहकार्यासंबंधी सामंजस्य करारास पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली आहे. हा करार 29 नोव्हेंबर 2017 रोजी झाला. करारामधून चिकित्सक, अधिकारी, अन्य आरोग्य कर्मचारी आणि तज्ञांचे आदान-प्रदान आणि प्रशिक्षण; मनुष्यबळाचा विकास आणि आरोग्य केंद्रांची स्थापना; औषधांचे नियमन आणि स्वच्छता अश्या अनेक विषयात कार्य केले जाणार आहे.
Q.3) OBC च्या उप-वर्गीकरणासंबंधी मुद्द्यांची तपासणी करण्याकरिता गठित आयोगाचा कार्यकालावधी 12 आठवड्यांनी वाढविण्यास मंजूरी मिळाली. हे आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे?
A) न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) के. केशवाणी
B) न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) येशूदास पंड्या
C) न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) जी. रोहिणी
D) न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) प्रकाश सैलाणी
उत्तर : C) न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) जी. रोहिणी
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने इतर मागासवर्गीय (OBC) यांच्या उप-वर्गीकरणासंबंधी मुद्द्यांची तपासणी करण्याकरिता गठित आयोगाचा कार्यकालावधी वाढविण्यास मंजूरी दिली आहे. व्यापक स्वरुपात अहवाल सादर करण्यासाठी न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) जी. रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली गठित आयोगासाठी 12 आठवडे म्हणजेच 2 एप्रिल 2018 पर्यंत मुदत वाढविण्यात येणार. हे आयोग 2 ऑक्टोबर 2017 रोजी गठित करण्यात आले होते.
Q.4) डिसेंबर 2017 मध्ये APEDA ने कोणत्या राज्यातून दुबईकडे हिरव्या मिर्चीची पहिली प्रायोगिक तत्वावर खेप पाठवली?
A) पंजाब
B) उत्तरप्रदेश
C) गुजरात
D) बिहार
उत्तर : B) उत्तरप्रदेश
स्पष्टीकरण : उत्तरप्रदेशातील ताज्या भाज्यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी APEDA ने वाराणसीहून दुबईकडे हिरव्या मिर्चीची पहिली प्रायोगिक तत्वावर खेप पाठवली आहे.
Q.5) केंद्रीय मंत्रिमंडळाने कुठे देशातले पहिले ‘राष्ट्रीय रेल व परिवहन विद्यापीठ (NRTU)’ स्थापित करण्यास मंजूरी दिली?
A) पुणे, महाराष्ट्र
B) नागपूर, महाराष्ट्र
C) नवी दिल्ली
D) वडोदरा, गुजरात
उत्तर : D) वडोदरा, गुजरात
स्पष्टीकरण : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुजरातच्या वडोदरामध्ये देशातले पहिले ‘राष्ट्रीय रेल व परिवहन विद्यापीठ (NRTU)’ स्थापित करण्यास मंजूरी दिली आहे. रेल आणि परिवहन क्षेत्रात अभ्यासक्रम चालविणारे हे विद्यापीठ UGC (विद्यापीठ मानित संस्था) विनियमन-2016 अंतर्गत मानित विद्यापीठाच्या रूपात स्थापन केले जाईल. जुलै 2018 मध्ये प्रथम शैक्षणिक सत्र सुरू होण्याचे अपेक्षित आहे.
Q.6) कोणत्या देशासोबत भारतीय नौदलाचा 'नसीम-अल-बहार' हा द्विपक्षीय सराव आयोजित केला गेला?
A) सौदी अरेबिया
B) इराण
C) कतार
D) यापैकी नाही
उत्तर : D) यापैकी नाही
स्पष्टीकरण : भारत आणि ओमान यांच्या नौदलांमधील 'नसीम-अल-बहार' किंवा 'सी ब्रीज' या द्विपक्षीय सरावाला ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. 1993 सालापासून आयोजित करण्यात येणार्या द्वैवार्षिक सराव मालिकेमधील सरावाची ही 11 वी आवृत्ती आहे. भारतीय नौदलाची INS त्रिकांड आणि INS तेग ही जहाजे ही मस्कटमध्ये दाखल झाली आहेत.
Q.7) कोणत्या शहरातील प्रगत वाहतूक माहिती व व्यवस्थापन यंत्रणेच्या (ATIMS) प्रकल्पासाठी जपानच्या सरकारकडून 1.276 अब्ज जपानी येनची मदत मिळणार आहे?
A) दिल्ली
B) मुंबई
C) बेंगळुरू
D) कोलकाता
उत्तर : C) बेंगळुरू
स्पष्टीकरण : बेंगळुरूमध्ये प्रगत वाहतूक माहिती व व्यवस्थापन यंत्रणेच्या (ATIMS) अंमलबजावणीसाठीच्या प्रकल्पासाठी जपानच्या सरकारकडून 1.276 अब्ज जपानी येन (सुमारे 72.86 कोटी रुपये) इतक्या रकमेच्या वित्तीय मदतीकरिता दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
Q.8) कोणत्या भारतीय अधिकार्याची 2018 हॉकी विश्वचषक स्पर्धेत पंचांच्या मंडळात निवड करण्यात आली?
A) रघु प्रसाद
B) जीवनप्रकाश दत्त
C) जावेद शेख
D) A आणि C
उत्तर : D) A आणि C
स्पष्टीकरण : भारताच्या रघु प्रसाद आणि जावेद शेख यांची 2018 साली भुवनेश्वरमध्ये आयोजित हॉकी विश्वचषक स्पर्धेत पंचांच्या (umpires) मंडळात निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) ने 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2018 या काळात ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये कलिंगा क्रीडामैदानावर होणार्या स्पर्धेचे सर्व 5 खंडातील 19 देशांच्या 25 मॅच अधिकार्यांची घोषणा केली.
Q. 9) भारतीय भांडवली बाजारपेठांमध्ये विदेशी निधीचा ओघ वाढविण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने केंद्र शासनाच्या सिक्युरिटीजवरील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) साठी 1 जानेवारी 2018 पासून ________ रुपयांपर्यंत गुंतवणूक मर्यादा वाढविली आहे.
A) 1,91,300 कोटी रुपये
B) 1,89,700 कोटी रुपये
C) 60,300 कोटी रुपये
D) 31,500 कोटी रुपये
उत्तर : A) 1,91,300 कोटी रुपये
स्पष्टीकरण : भारतीय भांडवली बाजारपेठांमध्ये विदेशी निधीचा ओघ वाढविण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने केंद्र शासनाच्या सिक्युरिटीजवरील विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) साठी 1 जानेवारी 2018 पासून 1,91,300 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक मर्यादा वाढविली आहे. सध्या FPI साठी गुंतवणूक मर्यादा 1,89,700 कोटी रुपये एवढी आहे.
Q.10) लोकसभेत कोणत्या कायद्यामध्ये दुरूस्ती सुचविणारा ‘स्थावर संपत्तीची मागणी आणि संपादन (दुरूस्ती) विधेयक’ मंजूर करण्यात आला?
A) स्थावर संपत्ती अधिनियम-1942
B) स्थावर संपत्ती अधिनियम-1952
C) स्थावर संपत्ती अधिनियम-1932
D) स्थावर संपत्ती अधिनियम-1962
उत्तर : B) स्थावर संपत्ती अधिनियम-1952
स्पष्टीकरण : लोकसभेत स्थावर संपत्ती अधिनियम-1952 मध्ये दुरूस्ती सुचविणारा ‘स्थावर संपत्तीची मागणी आणि संपादन (दुरूस्ती) विधेयक-2017’ मंजूर करण्यात आला आहे. स्थावर संपत्तीचे संपादन करण्यासाठी संरक्षण आणि सुरक्षेच्या हेतूने केंद्र शासनाला देय कराव्या लागणार्या प्रशासकीय भरपाईसंबंधी नियमांमध्ये दुरूस्ती करणारे हे विधेयक आहे.
तुमचं वय कायतुमचं शिक्षण काय आहे?
तुम्ही कसे दिसतातुम्ही कुठे राहतायशाला या कोणत्याच गोष्टींचं देणंघेणं नाही.
तुम्ही प्रयत्न करा आज ना उद्या यशस्वी होणारच आहात.Thought By MPSC GUIDE
