महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार्‍या परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार्‍या परीक्षा :
» राज्यसेवा परीक्षा
» पोलिस उपनिरीक्षक / सहाय्यक / विक्रीकर निरीक्षक
» टंकलेखक / लिपीक परीक्षा

1. राज्यसेवा परीक्षा :
राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पद भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.
परीक्षेमार्फत भरली जाणारी पदे :
गट-अ

  1. Deputy Collector
  2. Deputy Superintendent of Police (DySP)
  3. Assistant Commissioner of Police (ACP)
  4. Sub-registrar Cooperative Societies
  5. Deputy Chief Executive Officer
  6. Block Development Officer (BDO)
  7. Tahsildar
  8. Desk Officer
  9. Assistant Regional Transport Officer (ARTO)
  10. M.F.A.S (Maharashtra Finance & Account Service)
  11. Chief Officer (Nagarpalika) ( I & II)
  12. Assistant Commissioner of Sales Tax
  13. Mantralaya Section Officer


गट-ब
1.Taluka Inspector of Land Records (TILR)
2. Naib Tahsildar

परीक्षेचे स्वरूप :
पूर्व परीक्षा : पूर्व परीक्षेसाठी 200 गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका असतात, यासाठी आपणास 2 तासांचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठबहुपर्यायी असून प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत असेल. पूर्व परीक्षा अभ्यासक्रम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणेच आहे.
मुख्य परीक्षा : यात 6 पेपर एकूण 800 गुणांकरिता असतात.

पेपर-1 : मराठी  गुण-100  वेळ-तीन तास
पेपर-2 : इंग्रजी  गुण-100  वेळ -तीन तास

मराठी व इंग्रजी दोन्ही पेपर हे दिर्घोत्तरी स्वरूपाचे असतील. भाषा अभ्यासक्रमात निबंध लेखन, व्यवहार, अहवाल लेखन, पत्रकार परिषद, औपचारिक भाषण तयार करणे, संवादकौशल्य, उतार्‍यावरील प्रश्न भाषांतर, सारांश लेखन व व्याकरण इ चा समावेश असेल.

चारही पेपर हे बहुनिष्ठबहुपर्यायी स्वरूपाचे असतात. या अभ्यासक्रमाची पातळी पदविस्तरावरची असते, 3:1 या प्रमाणे निगेटिव्ह मार्किंग पद्धत असेल (चुकीच्या 3 उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जाईल) प्रत्येकी पेपर 150 गुणांचा असेल व वेळ दोन तास असतील.

Paper – I - History & Geography
Paper –II - Indian Constitution & Indian Politics (with ref. to Maharashtra)& Law
Paper – III - Human Resource Development (HRD) & Human Rights
Paper – IV - Economics of Planning & Development Science &Technology Development

प्रत्येक पेपर मध्ये खुल्या गटातील उमेदवारांना 45% गुण व राखीव वर्गातील उमेदवारांना 40% गुण मिळवण आवश्यक आहे.
मुलाखतीसाठी 100 गुण असतील.

Archive

Contact Form

Send